Friday, May 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजShivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; म्हणाले,...

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; म्हणाले, युती, आघडीचे मी पाहतो…

मुंबई | Mumbai
कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील चार महिन्यात महापिलाकेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युती अथवा आघडीचे मी पाहतो, त्या भरवशावर तुम्ही राहू नका, असे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

- Advertisement -

ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल, अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांना होती. मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा असे अवाहन त्यांना संजय राऊतांनी केले होते. मात्र त्यांच्या अवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे बंधु पुन्हा एकत्र येणार की नाही या प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

त्यातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राज ठाकरेंना युतीसाठी विचारण्यात आल्याच्या चर्चा आहे. पण अद्याप ठाकरे अथवा शिंदे यांच्यासोबत युतीबाबत अधिकृत बैठक झाल्याचे समोर आलेले नाही. आता त्यातच मनपा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी युती-आघाडीच्या पुढे जात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही नेते आपला परदेश दौरा करुन माघारी आले आहे. मात्र अद्यापही युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाही. अशातच राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबतीत आता बोलू नका, अशा सूचना दिल्या आहेत. युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच घेऊ, असे आदेशदेखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता आता कामाला लागा, असे स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. त्याआधी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकते, असे लोकांना वाटत होते. या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र अद्याप ही दोन्ही नेत्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...