मुंबई | Mumbai
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षणाबाबत (Reservation) जे वक्तव्य केले आहे त्यावरून भाजपाने (BJP) त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी आरक्षणविरोधी आहेत असे भाजपाकडून सांगितले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, असे म्हणत गंभीर आरोप केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “त्यांच्या जिभेला चटके…”; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
यावेळी राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एक मंत्री, महायुतीतील (Mahayuti) एक आमदार आणि इतर काहीजण एकाच भाषेत राहुल गांधींवर बोलत आहेत. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याच्या गोष्टी ते करत आहेत. कोणी राहुल गांधी यांना आतंकवादी म्हणतोय तर काही जण त्यांची जीभ काढा असे म्हणत आहेत, तर काहीजण हल्ल्याची भाषा करत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पूर्ण विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. रशियामध्ये जे होत आहे ते भारतात होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचे काम केले जात आहे, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ganesh Festival : गणपती विसर्जनादरम्यान राज्यातील विविध भागांत दुर्घटना
तसेच काहीजण राहुल गांधी यांचे हाल त्यांच्या वडिलांसारखे आणि त्यांच्या आजीसारखे करण्याचे बोलत असेल आणि गृहमंत्री (Home Minister) शांत बसत असतील तर ही एक रणनीती आहे. त्याच्यामध्ये ते सुद्धा सहभागी आहेत. सगळ्यात आधी ही गोष्ट मी समोर आणली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात एक मोठी रणनीती आखली जात असून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ला (Attack) करण्याचा विचार काहीजण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा