Saturday, March 29, 2025
Homeनाशिकबाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो 'तो' व्हिडिओ...; संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो ‘तो’ व्हिडिओ…; संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

नाशिक | Nashik

राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचे रणशिंग फुंकण्यासाठी ठाकरे गटाचे (Thackeray Group) जानेवारीत नाशिकमध्ये (Nashik) महाशिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या महाशिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशकात दाखल झाले आहेत. अशातच आज सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सलीम कुत्ता प्रकरणावर भाष्य करतांना फोटो दाखवत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, सलीम कुत्तासोबतची पार्टी नाशिकमधील भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मोरे यांचा देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) असणारा फोटो देखील दाखवला. तसेच व्यंकटेश मोरे यांच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा बॉम्बस्फोटामधला भयंकर गुन्हेगार होता तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले. याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा. आजही व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी असून त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे पार्टीला जाणे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर यांनी दिलेला नाही. त्या व्हिडीओशी सुधाकर भाऊंशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ कोणी दिला ते नागपूरवाल्यांना माहिती आहे की तो व्हिडीओ कसा आला आहे. गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांचा कसा बुरखा फाटला आहे हे आम्ही दाखवले आहे. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) ज्या पार्टीला गेले होते ती पार्टी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : PM किसान योजनेचे १८१ बोगस लाभार्थी; गुन्हा दाखल

0
कळवण | प्रतिनिधी | Kalwan तालुक्यातील भादवण (Bhadvan) येथील पीएम किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) १८१ बोगस मुस्लिम लाभार्थ्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan...