Sunday, May 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "लाकडं पाठवून द्यावी, तसंही कराड सुटल्यावर…"; संजय राऊतांकडून ‘तो’...

Sanjay Raut : “लाकडं पाठवून द्यावी, तसंही कराड सुटल्यावर…”; संजय राऊतांकडून ‘तो’ खळबळजनक फोटो ट्वीट

मुंबई । Mumbai

- Advertisement -

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, एकीकडे वाल्मिक कराडला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात असताना आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा त्यांनी केलाय.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दिसून येत आहेत. “एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता,” असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र हे प्रकरण लावून धरलं आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे 302 च्या प्रकरणात सहभागी असल्याने आणि अवादा कंपनीकडून धनंजय मुंडेंनी 3 कोटींची मागणी केल्याने त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवं असं धस यांनी म्हटलं आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...