Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याShivsena crisis : शिवसेनेच्या नाव-चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Shivsena crisis : शिवसेनेच्या नाव-चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

दिल्ली | Delhi

- Advertisement -

सुप्रीम कोर्टात (Suprme Court) सत्तासंघर्षांचा (Political Crisis) नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर बुधवारी किंवा गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि चिन्हासंबधीची सुनावणी नवरात्र, दसरा यांच्या सुट्या आहेत त्यामुळे नोव्हेंबरमध्ये यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या