Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRamdas Kadam : आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण नको म्हणून…; रामदास कदमांचा...

Ramdas Kadam : आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण नको म्हणून…; रामदास कदमांचा उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai
दिवंगत शिवेसना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूला २३ वर्षे पूर्ण झाले असताना देखील अजूनही त्यांच्या मृत्यूवरून राज्यात अनेकदा वातावरण तापताना दिसते. आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झालो होता. हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे’, असा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर बोलताना रामदास कदम यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

रामदास कदम काय म्हणाले?
आनंद दिघेंचा अपघात होण्याच्या काही दिवस आधी ठाकरेंनी दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता, असा दावा रामदास कदमांनी केला आहे. आनंद दिघे यांचे खच्चीकरण उद्धव ठाकरे करीत होते हे १०० टक्के सत्य आहे. आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण नको. आनंद दिघे मोठी व्यक्ती होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिघे देव मानत होते. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला दिघेसाहेब बाळासाहेबांचे पाय धुण्याचे काम करीत होते.’ त्याच काळामध्ये म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला, ते हॉस्पिटलमध्ये भरती होते; त्याच आठ दहा दिवसांच्या दरम्यान उध्दव ठाकरेंनी त्यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता.”, असा खळबळजनक दावा कदम यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेत केला.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंनी अनेकांचे पंख कापले
तसेच,’उद्धव ठाकरे यांनी अनेक मोठ्या होणाऱ्यांचे पंख कापले. त्यात माझ्या सकट दिघेसाहेब देखील होते. धर्मवीर यांचे काम मोठे होते. पण आशीर्वाद त्यासाठी बाळासाहेबांचे होते. उध्दव ठाकरे यांनी दिघे यांचे पंख कापण्याचे काम केलेय’, असा देखील खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे चांगले काम करीत आहे – कदम
“मला वाटते की याबाबतीत आता अधिक चर्चा करण्यापेक्षा, आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत याबाबतीत चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. तो अतिशय स्तुत्य असा आहे. आनंद दिघेंबद्दल नव्या पिढीला कल्पना नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे करताहेत. चांगलं काम करताहेत”, अशी भूमिका त्यांनी धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलताना मांडली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या