Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuhas Kande : "ते ओरिजनल भुजबळ..."; आमदार कांदेंचे छगन भुजबळांना ओपन चॅलेंज

Suhas Kande : “ते ओरिजनल भुजबळ…”; आमदार कांदेंचे छगन भुजबळांना ओपन चॅलेंज

नागपूर | Nagpur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. यात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या (शिंदे गट) ११ आणि राष्ट्रवादीच्या (९) आमदारांचा समावेश होता. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत. अशातच आता भुजबळांचे कट्टर विरोधक आणि नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत त्यांना थेट राजीनामा देण्याचे चॅलेंज दिले आहे. त्यांनी माध्यमांना बोलतांना ही प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना कांदे म्हणाले की, “मी एकदा छगन भुजबळांना बोललो होतो की, साहेब तुम्ही दिसायला सुंदर असता तर तुम्ही चांगले अभिनेते झाले असता. पण दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाहीत म्हणून ते अॅक्टर झाले नाहीत. फक्त छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं म्हणजे ते ओबीसी समाजाला दिलं, असं होतं का? छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? एका बाजूला भुजबळांनी मुलाला दिलं, दुसऱ्या बाजूला पुतण्याला दिलं. छगन भुजबळ यांनी दिंडोरी आणि नाशिक लोकसभेत काम केलं नाही, याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिले. त्यामुळेच भुजबळांना मंत्रिपद मिळाले नाही हे मी आवर्जून सांगेन”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “भुजबळांनी कितीही आगपाखड करावी, ढोंग करावं, पण ते राजीनामा देणार नाहीत. ते खरचं ओरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला पुन्हा उभे राहावे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना डिवचले. तसेच मी जातपात मानत नाही, पण छगन भुजबळ यांच्या येवल्यातील मेळाव्यात विशिष्ट जातीचे लोकच दिसतील, १०० पैकी ९९ जण एकाच जातीचे आहेत. या एकाच समाजाचे लोक छगन भुजबळ यांना डोक्यावर उचलतात. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुतीसोबत केलेल्या गद्दारीचे फळ मिळाले आहे”, असेही कांदे यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...