Thursday, July 23, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत कोपरगावच्या पदाधिकार्‍यांमध्ये वादंग दमबाजीमुळे महिला पदाधिकारी रूग्णालयात

Shirdi : शिर्डीत कोपरगावच्या पदाधिकार्‍यांमध्ये वादंग दमबाजीमुळे महिला पदाधिकारी रूग्णालयात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर कोपरगाव येथील दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली असून काही पदाधिकार्‍यांनी एका महिला पदाधिकार्‍याला दमबाजी करून धमकी दिली. या प्रकारामुळे महिला पदाधिकार्‍यांचा ब्लड प्रेशर वाढला त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशीरा या महिला पदाधिकार्‍यास रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

- Advertisement -

राहाता व कोपरगाव तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक गुरुवारी सकाळी बारा वाजे दरम्यान शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे त्यांनी राहाता व कोपरगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस संगमनेरचे आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, विजय काळे, विमलताई पुंडे, सविताताई शेळके, मनीषाताई डुबल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पदाधिकार्‍यांची बैठक संपल्यानंतर काही वेळातच कोपरगाव येथील दोन गटातील पदाधिकार्‍यांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. तिथे कोपरगाव गटातील काही पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या कोपरगाव तालुका महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मीनाक्षीताई वाकचौरे यांना दमबाजी केल्याने या बैठकीत एकच गोंधळ उडाला. या वादाचे रूपांतर धराधरीत होऊ नये म्हणून काही पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील हा वाद मोठ्या प्रमाणात सुरूच राहिल्यामुळे मीनाक्षीताई वाकचौरे यांचा अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना सुपर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशीरा त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत

0
मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी...