Saturday, June 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराहुल गांधींपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल; वाराणासीतून जवळजवळ मोदींचा पराभव झाला...

राहुल गांधींपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल; वाराणासीतून जवळजवळ मोदींचा पराभव झाला होता, पण…

मुंबई | Mumbai
काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपवर निवडणूक चोरीचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी विचारणा करत यावर निशाणा साधला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केलाय.

मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे, अशा पद्धतीने ते लढले. आपल्या लक्षात आले असेल की, वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते. त्यानंतर मतमोजणी थांबविण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील लाईट घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. डाटा उडाला आणि नवीन मशीन आणण्यात आल्या. दिल्लीतून यंत्रणा हलली. वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता. दोन तास या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली.

- Advertisement -

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक अनाकलनीय होती
महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी ३ फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली होती. देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असे मी म्हणत नाही; परंतु जे घडले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी छोट्या-मोठ्या गोंधळाबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल बोलत आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत; परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती.

गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे
या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरीही केवळ अधिकृत अशा आकडेवारीवरूनही सगळा खेळ समोर येतो. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात : निवडणूक आयोग आणि भाजप!, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

जगात नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली
संजय राऊत पुढे म्हणाले की, तोच प्रकार महाराष्ट्रात झाला. राहुल गांधी आणि आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली. निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले. ईव्हीएम मशीनची तर समस्या आहेच. शेवटच्या दोन तासात 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढविण्यात आले. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे जगाला कळले. जगात नरेंद्र मोदी आणि आपल्या सरकारला अपमान सहन करावा लागतोय. हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकूमशाही प्रवृत्तीने काम करतात. हे लोक निष्पक्ष निवडणूक करत नाहीत. जगात नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “आतापर्यंतचा माझा अनुभव…”; ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार...

0
मुंबई | Mumbai  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ठाकरे...