मुंबई | Mumbai
शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या ( Mla Disqualification) सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केले असून अध्यक्षांनी निष्पक्षपातीपणे काम करुन वेळकाढूपणा करु नये, असे आवाहन केलेय.
अनिल परब म्हणाले,अध्यक्षांचे वेळापत्रक ही धूळफेक आहे. सुप्रिम कोर्टाच्य दट्ट्यानंतर आता तारखा पडत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिले आहे, त्यामुळे पुरावे पाहण्याची गरज नसून वेगवेगळी सुनावणी घेण्याची ही गरज नाही. सुप्रीम कोर्टाला २३ नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा कळवल्या आहे.
MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…
त्यानंतर उलट तपासणी सुरु होणार आहे, परंतु उलट तपासणी किती वेळ चालणार याबद्दल काही माहिती नाही. एक महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण संपवायला हवे. आतपर्यंत निकाल लागणे अपेक्षीत होता. मात्र, आमदार अपात्र होतील यामुळे वेळकाढूपणा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे टाईमटेबल दिले जाईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू.
दरम्यान, विधासभा अध्यक्षांमोर सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री आमदार प्रतोद यांच्या चुका सारख्याच आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
Shivsena Crisis : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; नेमकं प्रकरण काय?
असं असेल वेळापत्रक
13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होईल
23 नोव्हेंबरनंतर अंतिम सुनावणी दोन आठवड्यात होणार
13 ऑक्टोबर – सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही, यावर सुनावणी संपन्न होईल
13 ते 20 ऑक्टोबर – दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल
20 ऑक्टोबर – सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल देण्यात येईल
20 ऑक्टोबर- काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी त्यांना संधी दिली जाईल
27 ऑक्टोबर- दोन्हीही गट आपापलं स्टेटमेंट मांडतील
6 नोव्हेंबर- या तारखेपर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील
“…त्यासाठी १४५ आमदार लागतात”; नाव न घेता मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर वार, नंतर ट्वीट डिलीट
10 नोव्हेंबर- दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल
20 नोव्हेंबर- दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल
23 नोव्हेंबर- साक्षीदारांची उलट साक्ष होईल
सर्व पुरावे तपासल्यानंतरच दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल