Thursday, May 22, 2025
Homeनगरशिवसेना ठाकरे गटाच्या नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीला स्थगिती

शिवसेना ठाकरे गटाच्या नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीला स्थगिती

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जाहीर झालेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमनेर तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांची 29 ऑक्टोबर रोजी तालुकाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर नवे तालुकाप्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे यांची वर्णी लागली होती. मुजीब शेख यांची उपजिल्हाप्रमुख तर अमर कतारी यांची संगमनेर शहर प्रमुखपदी तर शिर्डी लोकसभा जिल्हा संघटकपदी आप्पाशेठ केसेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. जुन्या पदाधिकार्‍यांना विश्वासात व विचारात घेतले नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते.

नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी आम्हाला विश्वासात न घेता झाल्याने जनार्दन आहेर यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली होती. संगमनेरात ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते.

यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीला शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे स्थगिती दिल्याची बातमी झळकली. पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर आठवडाभराच्या आतमध्ये त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. आता पक्षश्रेष्ठी पुढील कोणता निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘एफडीए’तील दोघांची चौकशी; सुपारीकांडाचा सखोल तपास, साखळी उघड...

0
नाशिक |प्रतिनिधी | Nashik अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी दोन ट्रकचालकांकडील रोकड, मोबाइल, वाहनांची कागदपत्रे व चाव्या हिसकावून नेल्याची घटना...