Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "ही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता"; उध्दव...

Uddhav Thackeray: “ही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता”; उध्दव ठाकरेंची महायुतीवर जोरदार टीका

मुंबई | Mumbai
गेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी (२६ मार्च) सूप वाजले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण १६ दिवस अधिवेशनात कामकाज चालले. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होते. अपयश लपवणारे अधिवेशन होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.

काय म्हणाले उध्दव ठाकरे?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या अधिवेशनाकडे आपणं पाहिले, तर पाशवी बहुमत मिळवल्यानंतर काही मिळणार नाही, असे हे अधिवेशन होते. अपयश आणि अस्वस्थता लपवणारे हे अधिवेशन होते. हे सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसात आम्ही काय करणार आहोत, सांगितले गेले होते. पण त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांना हमीभाव मिळत नाही. वनविभागाला न्याय मिळत नाही. या १०० दिवसाच्या आराखड्यातील एकही गोष्ट या सरकारने पूर्ण केलेली नाही किंवा त्याबाबत निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले नाही. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक हत्या घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. शांत असलेल्या नागपूरमध्ये दंगल झाली. माझा तर संशय आहे की, ज्या लोकांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे, त्यांनी अशा घटना घडवल्या आहेत का? असा संशय ठाकरेंनी व्यक्त केला.

- Advertisement -

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालक आपटेवर अद्याप कारवाई नाही? मात्र कॉमेडियन कुणाल कामराने गद्दारावर टीका केली की लगेच कारवाई. अधिवेशन काळात देशाला राज्याला चांगले गाणे मिळाले. हे समाधान मानावे लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असे अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठरावा आणावा लागला
सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला, असेही कधीच झाले नव्हते. अधिवेशन काळात आम्हाला बोलू दिले असते आणि उत्तरे दिली असती तर मला जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा वारेमाप घोषणा सरकार करत आहे. जनता भोळीभाबडी आहे, त्यामुळे जनतेला फसवा आणि सत्तेत या. त्यानंतर जनतेला चिरडून टाकले गेले. परंतु ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही, ती यांना काय जमणार, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

सौगात ए सत्ता
मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला. हिंदूच्या मंगळसूत्राचे आता रक्षण कोण करणार? हिंदुत्ववादी पक्ष आता आहे का? सौगात ए सत्ता ही बिहार यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार आहे. भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case : “धनंजय मुंडेंना पाठीशी न घालता त्यांच्यावर…”; मनोज...

0
मुंबई | Mumbai बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीतील...