मुंबई | Mumbai
जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी वेव्हज परिषदेसाठी काल (शुक्रवारी) मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ बिहारला गेले. त्याठिकाणच्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुश मिजास आहेत. पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दुख दिसले नाही, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”देशात (Country) युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. काल फोटो आले, गौतम अदाणी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाही. मात्र, आम्ही चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटाही यावेळी संजय राऊत यांनी
काढला.
तसेच “देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले, मग मारा ना. कोणी अडवले? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत. काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलं, तसंच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवलं? २७ जणांचं हत्याकांड झालं त्यात राज्यातील ६ माणसं आहेत. आमच्याच लोकांना चुन चुन के मारलं. त्यामुळे अमित शाहांनी राजीनामा (Resign) दिला पाहिजे”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. तसेच विरोधकांनी अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याने आपल्याला त्यांची कीव वाटते”, असेही राऊत म्हणाले.