Thursday, May 1, 2025
Homeनगरशिवशाही-स्कुल बसचा लोणीत अपघात

शिवशाही-स्कुल बसचा लोणीत अपघात

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील (Rahata) लोणी खुर्द (Loni Khurd) गावातील बाभळेश्वर रस्त्यावर (Babhaleshwar) शिवशाही व स्कुल बसचा बुधवारी दुपारी अपघात (Shivshahi Bus and School Bus Accident) झाला. मात्र या भीषण अपघातात विद्यार्थी व प्रवाशी दैव बलवत्तर म्हणून बचावले.

- Advertisement -

इकडे दहशत चालणार नाही, अन तिकडचीही कमी करु – आ. थोरात

याबाबतची घटना अशी, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस एमपी 09 ईएम 1980 बाभळेश्वरकडून लोणीमार्गे पुण्याकडे जात होती. लोणी खुर्द (Loni Khurd) गावातील प्रिन्स चौकातून लोणी येथील लिटिल फ्लावर स्कुलची बस विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी लोणी खुर्द (Loni Khurd) गावातून पीपीएस रस्त्याने तिसगाववाडीकडे जात होती.

नगर जिल्हा राष्ट्रवादीत बदल ?

बुधवारी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास रस्ता मोकळा असल्याने स्कुल बसच्या चालकाने बस चौक ओलांडण्यासाठी पुढे नेली. तेवढ्यात बाभळेश्वर (Babhaleshwar) रस्त्याने शिवशाही बस भरधाव वेगाने आली. समोर एक टँकर जात होता. चौकात मोठे गतिरोधक असताना त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करून शिवशाहीच्या चालकाने बस पुढे नेली आणि ती स्कुल बसवर जोराने धडकली.

शिर्डी पाळणा दुर्घटनेनंतर साळवे कुटुंबियांची मदतीसाठी हाक

विद्यार्थी आणि प्रवाशी घाबरून आरडाओरड करू लागले. स्थानिक नागरिक मदतीला धावले. या भीषण अपघातात (Accident) दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र प्रवास करणारे प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावले.चौकात गतिरोधक नसता तर हा भीषण अपघात (Accident) घडला असता. शिवशाहीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. एकही विद्यार्थ्याला साधे खरचटले सुद्धा नाही. यामुळे पालक आणि शाळेच्या व्यवस्थापनाची चिंता दूर झाली.

वाद घालून दीड लाखांचा ऐवज लांबविला

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाकाजात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यातील सरकारी कार्यालयांना (Government Offices) शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने...