Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याShivshakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे आज सिन्नरमध्ये

Shivshakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे आज सिन्नरमध्ये

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा परिक्रमा दौरा सुरू केला असून या परिक्रमेदरम्यान महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि देवीच्या साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी तसेच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेणार आहेत. मंगळवारी (दि.5)सकाळी 10 वाजता त्यांचे सिन्नर तालुक्यात आगमन होणार आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चिंचोली फाटा, माळेगाव फाटा, माळवाडी दोडी, नांदूर असे मार्गक्रमण असून या दरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्ते या यात्रेचे स्वागत करणार आहे. माळवाडी येथून नांदुरशिंगोटे पर्यंत तरुण कार्यकर्त्यांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीत 250 ते 300 मोटरसायकली व कार्यकर्ते असणार आहेत. क्रांतिवीर वसंतराव नाईक स्मारक, बौद्ध विहार तसेच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे स्मारकाला त्या भेट देणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या