Thursday, December 12, 2024
HomeधुळेDhule Loksabha 2024 : मविआच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव 'इतक्या' हजार मतांनी...

Dhule Loksabha 2024 : मविआच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव ‘इतक्या’ हजार मतांनी आघाडीवर

नाशिक | Nashik

आज देशासह राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आज सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील आठही लोकसभा मतदारसंघांत जिल्ह्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात यंदा कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात लढत होत आहे. आज सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर थोड्या फार मतांनी कधी बच्छाव तर कधी भामरे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मतमोजणीची अकराव्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. अकराव्या फेरीत काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी मुसंडी मारली असून त्यांनी अकराव्या फेरीत १२ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची दहाव्या फेरीची आघाडी तोडून ही आघाडी घेतली आहे.

दहाव्या फेरीत डॉ. सुभाष भामरे यांना ३ लाख ८६ हजार १९० मते मिळाली होती. तर डॉ. बच्छाव यांना ३ लाख ७४ हजार इतकी मते मिळाली होती. त्यावेळी ही मतांची आघाडी १२ हजारांची होती. त्यांनतर आता अकराव्या फेरीत बच्छाव यांनी ही आघाडी तोडत १२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर सहाव्या फेरीत भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना २ लाख १६ हजार ५३१ मते तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना २ लाख १ हजार ३९९ मते मिळाली होती. त्यामुळे धुळ्यात अटीतटीची लढत होताना पाहायला मिळत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या