Tuesday, May 28, 2024
Homeनगरधक्कादायक : तरूणाकडून ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार

धक्कादायक : तरूणाकडून ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी | Ahmednagar

चल तुला मोबाईल खेळायला देतो, असे म्हणत एका 8 वर्षीय बालिकेवर तरूणाने अत्याचार केल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावामध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रशीद सरदार बेग (वय- 28) याच्याविरूद्ध अत्याचार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत बालिकेच्या आईने फिर्याद दिली आहे. गुरूवारी दुपारी दीड ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी बेग हा दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर आला. यावेळी फिर्यादी यांची 8 वर्षे वय असलेली बालिका घरासमोर ओट्यावर खेळत होती. यावेळी आरोपी बेग पिडीत बालिकेला म्हणाला, ‘चल तुला मोबाईल खेळायला देतो’. असे म्हणत पिडीत बालिकेला बेग याने त्याच्या घरी नेले. घरी नेवून बालिकेवर अत्याचार केल्याचे पिडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत बालिकेच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बेग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक जाधोर यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक जाधोर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या