Friday, May 16, 2025
Homeधुळेधक्कादायक : धुळ्यात सुतळी बॉम्बने घेतला युवकाचा जीव

धक्कादायक : धुळ्यात सुतळी बॉम्बने घेतला युवकाचा जीव

धुळे Dhule

- Advertisement -

शहरातील जुने परिसरात (old area) ऐन दिवाळीत (Diwali) अत्यंत दुर्दैवी घटना (unfortunate incident) घडली आहे. सुतळी बॉम्ब (Twine bomb) फोडताना (while breaking) युवकाचा (youth) मृत्यू (death) झाला. काल सायंकाळी ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सोनू कैलास जाधव (वय 14 रा. बर्फ कारखाना परिसर, आदिवासी वस्ती, जुने धुळे ) असे मयत युवकाचे नाव आहे. हा युवक काल घराजवळ फटाके फोडत होता. तेव्हा त्याने सुतळी बॉम्ब लावून त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. बॉम्बचा स्फोट होताच स्टीलच्या ग्लासचे तुकडे तुकडे झाले. त्यातील एक तुकडा थेट या युवकाच्या छातीत घुसला. त्यानंतर युवक पळतच घराकडे आला आणि जमिनीवर कोसळला.

ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक व कुटुंबीय धावून आले. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे फटाके फोडताना काळजी घेणे आवश्यक असून पालकांनी मुलांसोबत राहणे गरजेचे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...