Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजन14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले

14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले

मुंबई –

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान हिने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ती देखील कधीकाळी नैराश्यामध्ये होती असं तिने या

- Advertisement -

व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. परंतु इतक्या श्रीमंत घरात जन्माला आलेली इरा नैराश्येमध्ये का होती? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. त्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं आहे. 14 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असा खळबळजनक खुलासा तिने केला आहे.

इराने एका इन्स्टाग्राम व्हिडीओजच्या माध्यमातून आपल्या ड्रिप्रेशनचं कारण सांगितलं. ती म्हणाली, मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी 14 वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळायची. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. परिणामी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.

असा अनुभव इराने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर हिंदी डबिंग करुनही अपलोड केला आहे. पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही तो व्हिडीओ पाहू शकता – https://www.youtube.com/watch?v=bJFGTy38pO8&ab_channel=IraKhan

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...