Saturday, April 25, 2026
HomeनगरCrime News : गोरक्षकावर हल्ला, हात-पाय बांधून लुटले

Crime News : गोरक्षकावर हल्ला, हात-पाय बांधून लुटले

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील तिसगाव येथील गोरक्षक भारत लिपारे (वय ३९) यांच्यावर ९ जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात लिपारे यांची दीड तोळ्यांची सोन्यांची चेन आणि आठ हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. तसेच, हल्लेखोरांनी लिपारे यांचे हात-पाय बांधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तलवारीसह लाकडी दांडके, बेल्ट, फायटरने मारहाण केली.

- Advertisement -

याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २९ रोजी घडला आहे. लिपारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आईला दवाखान्यातून घरी आणत असताना त्यांना गोरक्षक मित्राकडून कत्तलीसाठी गाय व वासरू नेणाऱ्या पिकअपची माहिती मिळाली. यानंतर तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकात ते थांबले असता, दोन इसमांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना रविवार पेठेतील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांना एका घरात डांबून ठेवले. यावेळी हल्लेखोरांनी लिपारे यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या पँटवर पाणी टाकले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तलवारीने हल्ला करून आणि मॉब लिंचिंगची धमकी देऊन त्यांना जीवघेणी भीती दाखवली.

लिपारे यांनी मित्राला फोनवरून माहिती दिल्याने पोलिसांना याची खबर मिळाली. पोलीस गाडी घटनास्थळी पोहोचताच हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी लिपारे यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले. लिपारे यांचे मित्रांनी दाखवलेल्या फोटोंवरून हल्लेखोरांची ओळख पटली. यामध्ये शाकीर कुरेशी, इरफान कुरेशी, इरशाद कुरेशी, अरबाज राजू पठाण, अफजल हनिफ कुरेशी, जुनेद शेख, बबलू जब्बार कुरेशी, सलीम माजीद कुरेशी आणि रफीक कुरेशी (सर्व रा. तिसगाव) यांचा समावेश आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना परिसरात तणाव निर्माण करणारी ठरली असून, गोरक्षकांवरील हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकात ते थांबले असता, दोन इसमांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना रविवार पेठेतील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांना एका घरात डांबून ठेवले. यावेळी हल्लेखोरांनी लिपारे यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या पँटवर पाणी टाकले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तलवारीने हल्ला करून आणि मॉब लिंचिंगची धमकी देऊन त्यांना जीवघेणी भीती दाखवली.

दरम्यान, गोरक्षकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून तिसगाव येथील बेकायदा कत्तलखाने जमिनदोस्त करावेत, गोरक्षकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षा समिती, हिंदू रक्षा युवा मंच आदी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांना देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे किशोर परदेशी, बाळासाहेब गिते, नानासाहेब पालवे, आशुतोष शर्मा, दत्तात्रय गीते, महेश अंतरकर, आदिनाथ लगड, किशन फतपुरे, सोमनाथ बंग, सारंग मंत्री, तेजस पटवा, समर्थ रोडी, रवींद्र मोहिते, राजु हराळ यांच्यासह शेकडो तरुण उपस्थित होते.

भारत लिपारे या गोरक्षकावर जीवघेणा हल्ला झाला असून नगर दक्षिण विभागातील सर्वांत मोठा कत्तलखाना तिसगाव येथे आहे. या कत्तलखान्याकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नाही. मराठवाड्यातील आष्टी, शिरुर कासार, देवराई, पाटोदा, पैठण या तालुक्यांतून व्यायसायिकांना तिसगाव येथून गोमांसाची तस्करी केली जाते. पाथर्डी तालुक्यातील गोरक्षक आपले काम गोमातेच्या रक्षणासाठी प्रामाणिकपणे करत आहेत. गोमांस तस्करीमध्ये गोरक्षक कायदेशिर मार्गाने प्रतिबंध करतात. या कामामध्ये अडथळा नको म्हणून अवैध कत्तलखाने चालकांकडून यापुर्वीही वेळोवेळी गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले आहेत. संघटीत गुन्हेगारीचा हा प्रकार तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असून या प्रकारातून मोठा आर्थिक स्त्रोत निर्माण झालेला आहे. यातूनच ही मंडळी दादागीरी, गुन्हेगारी, छेडखानी, अवैध शस्त्रविक्री व अवैध धंदे करत आहेत. यामुळे शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस राजकीय भेटीची चर्चा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची...