नाशिक। प्रतिनिधी Nashik
पंचवटीतील शिक्षक पत्नीच्या खुनाचा तपास सुरु असतानाच, दुसऱ्या घटनेत साेसायटीतील पार्किंगच्या वादातून साेसायटी चेअरमनसह कुटुंबाने सदनिकाधारक व मुलांना केलेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पंचवटी पोलीस बापासह दोन मुले अशा तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
वसंत घोडे, गणेश वसंत घोडे, विशाल वसंत घोडे (सर्व रा. श्री केशव हरि अपार्टमेंट, दामोदरनगर, हिरावाडी, पंचवटी) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित बापलेकांची नावे आहेत. तर, बुध्दन लक्ष्मण विश्वकर्मा (४९, रा. केशव हरि अपार्टमेंट, दामोदरनगर, हिरावाडी) यांचा या खुनी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
शवविच्छेदनातून उकल
हृदयविकाराने बुद्धन विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक कयास व्यक्त करण्यात आला. परंतु शवविच्छेदन करण्यात आले असता, त्यातून गंभीर बाब समाेर आली. बुद्धन यांच्या छातीवर संशयितांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे मोठ्याप्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यु झाल्याचा अहवाल आला. यानंतर, संशयित घोडे बापलेकांना ताब्यात घेतले. तसेच, पंचवटी पोलिसात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव हे तपास करीत आहेत.