हैदराबाद | Haidrabaad
संपूर्ण देशात करोनाचा कहर सुरू असताना त्यातच आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे भीषण दुर्घटना घडली आहे. विजयवाडा येथील एका Covid Center ला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- Advertisement -
या दुर्घटनेत आतापर्यंत या १० जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृत्यु झालेल्यांमध्ये काही करोनाग्रस्तांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेश सरकारने यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.