Monday, April 28, 2025
Homeधुळेधक्कादायक : धुळ्यात महिलेचा खून

धक्कादायक : धुळ्यात महिलेचा खून

धुळे ।dhule । प्रतिनिधी

शहरातील साक्रीरोडवरील गोपाळ नगर मागील जमनागिरी भिलाटीत 35 वर्षीय महिलेचा (woman) खून झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. तिच्या सोबत राहणार्‍यानेच मारहाण करीत तिचा खून (Murder) केला. याप्रकरणी संशयित आरोपीवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

निता वसंत गांगुर्डे (रा. घर क्र. 5 गोपाळ नगर मागे, भिलाटी जमनागिरी, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय 28 रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. 9 देवपूर, धुळे) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निता ही बादल सोहिते (नाहार) रा. गोपाळ नगर मागे, भिलाटी जमनागिरी याच्या सोबत लग्न करण्यासाठी मार्च 2020 पासून घरातून निघून गेली होती. आणि गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निता ही संशयित आरोपी बादल सोहिते यांच्या सोबत घर नं. 5 गोपाळ नगर येथे राहत होती. त्यादरम्यान बादल याने काल दि. 14 रोजी रात्री 10 ते दि. 15 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान निता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला चेहरा व गळ्यावर, हातावर बेदम मारहाण करीत तिचा खून केला. त्यावरून बादल सोहिते याच्याविरोधात भांदवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि डी.पी.पाटील हे करीत आहेत.

सकाळी उघडकीस आली घटना

आज सकाळी जमनागिरी भागात नळाला पाणी आले असल्याचे निता हिच्या घरासमोर राहणारी एक मुलगी तिला सांगायला गेली. तेव्हा निता ही अंथरुणात मृतावस्थेत दिसून आल्याने तिने घाबरत आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. बादल हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून निता हिला मारहाण करीत होता. काल रात्री देखील चारित्र्याच्या संशयावरून विनोदने निताला बेदम मारहाण केली. तर सकाळी साडेआठ वाजता बादल हा नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन घरातून बाहेर पडल्याची परिसरात चर्चा होती. तसेच तो मनपात सफाई कर्मचारी म्हणूनही काम करतो.

पोलिस अधिकार्‍यांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सपोनि पाटील, पोसई दामोदर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...