Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्रभयंकर! अल्पवयीन मुलीने Youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन् नवजात बाळाला...

भयंकर! अल्पवयीन मुलीने Youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन् नवजात बाळाला…

नागपूर | Nagpur

- Advertisement -

माणसाच्या आयुष्यात जेव्हापासून मोबाईल आला आहे. तेव्हा पासून माणूसही मोबाईल प्रमाणे वागू लागला आहे. कारण सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीचं सोल्यूशन असतं, असं अनेकांना वाटतं. असाच एक प्रकार नागपूरातून समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःचीच प्रसूती केली आणि बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नागपूरातील अंबाझारी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. सदर मुलगी ही इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. गेल्या वर्षी ठाकूर नामक युवकाशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली. या मुलीच्या घरी ती आणि तिची आई अशा दोघीच मायलेकी राहतात. आई एका खासगी कंपनीत काम करते. आई घरी नसताना मुलीचे मित्राशी संबंध वाढले. तसेच ती त्याला भेटू लागली.

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन घेतलं देवदर्शन; शिवसेनेच्या नेत्याकडून टीकास्त्र

पुढे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. नंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या आईपासून दडवून ठेवली. गर्भवती असताना युवतीने युट्यूब बघून प्रसूतीसाठी लागणारे साहित्य जमवले आणि शुक्रवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने युट्युबवर बघितलेल्या साहित्याच्या मदतीने स्वतःची प्रसूती केली आणि बाळाला जन्म दिला.

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

बाळाला जन्म दिल्यानंतर युवती घाबरली. बाळ रडल्यास शेजाऱ्यांना आवाज जाईल व आपले बिंग फुटेल या भीतीने तिच्या मनात घर केले आणि तिने जवळच असलेल्या पट्ट्याने गळा आवळून बाळाला ठार केले. बाळाचा मृतदेह एका ट्रेमध्ये सज्जावर ठेवला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तिची आई घरी परतली असता, धक्काच बसला. आईला मुलीची प्रकृती खालावलेली दिसली आणि घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही दिसले. त्यानंतर आईने मुलीला विचारणा केली असता, घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. आईने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

अल्पवयीन युवती रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. तिने किती वेळ युट्युबवर प्रसूती कशी करतात, हे बघितले. ज्या युवकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तो कोण आहे? याची माहिती जबाबातून समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या