नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल आता समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे…
फिरकीचा जादूगार अशी ओळख असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याच्या अकाली मृत्यूबाबत एका वर्षानंतर डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचे कारण करोनाची लस (Corona Vaccine) असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
‘त्या’ टीकेवर फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “करोनाची लस मोदींनीच तयार केली…”
वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने घेतलेल्या कोविड लसीमुळे हृदयाशी संबंधित आजार वाढतात, असे या अहवालात समोर आले आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टने शेन वॉर्नच्या मृत्यूचे कारण कोरोनाची लस असू शकते असे म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच? छगन भुजबळांनी केली ‘ही’ मोठी मागणी
शेन वॉर्नने कोविड एमआरएनए लस घेतली होती, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या सुमारे नऊ महिने आधी ही लस देण्यात आली होती. ही लसच वॉर्नच्या मृत्यूचे कारण ठरली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
बापरे! पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘तो’ ६०३ दिवस राहिला फुकट; तब्बल 58 लाखांची फसवणूक