नाशिक | Nashik
आपल्याला साप समोर दिसला तरी अंगाचा थरकाप उडतो, किंवा अंगावर काटा उभा राहातो. अनेकदा शेतात, रानावनात, घराच्या आसपास जरी साप दिसला तरी भल्या भल्यांची पळताभूई थोडी होते. त्यातच जर तो साप विषारी असेल तर मग मृत्यूला आमंत्रण देण्यासारख असून असं म्हंटल तर अजिबात वावगे ठरणार नाही. कारण विषारी सापांच्या दंशाने अनेक जणांच मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
शेतातील घर किंवा रानावनातील घराजवळ सापांचा धोका अधिक असतो. त्यातच अशा घरांना वन्यप्राण्यांचा धोकाही अधिक असतो. कारण साप अनेकदा शेतातील बिळांमध्ये अढळतात. त्यात पावसाळा आणि जमिनीची उष्णता वाढली की साप बिळातून बाहेर येतात . सापाच्या एका दंशाने आपण यमराजाकडे पोहोचतो.
अशात या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भल्यामोठ्या नागाने झोपलेल्या बाळाला विळखा घातला. हा नाग लांबसडक काळ्या रंगाचा आहे. तो पाळण्याला विळखा घालून पाळण्याच्या दोरीवरुन वेगात वर सरकत आहे.
दरम्यान, हा नाग बराच वेळ पाळण्याच्या दोरीला विळखा घालून होता. या घटनेचा व्हिडीओ डॉ. प्रशांत भामरे यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला असून ज्या शेतकरी मित्रांचे घर शेतशिवारात आहे त्यांनी जरा काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.