Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनप्रभास आणि सैफ अली खानच्या बहुचर्चित 'आदिपुरुष' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

प्रभास आणि सैफ अली खानच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

मुंबई | Mumbai

सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘आदिपुरूष’ या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. प्रभासने स्वत: आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. प्रभासने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आदिपुरुष चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली असल्याचं म्हटलं आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफसोबतच बाहुबली फेम अभिनेता प्रभास देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्यानं चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. स्वत: ओमनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kopargav : गोदापात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav शहरातील गजानन नगर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात (Godavari River) एका अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ...