Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; लष्कर-ए-तैयबाशी होते संबंधित

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; लष्कर-ए-तैयबाशी होते संबंधित

दिल्ली | Delhi

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सैन्य दलातील जवानांची चकमक उडाली आहे. या चकमकीत सैन्य दलातील जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मारिफत मकबूल आणि जाझिम फारुक उर्फ अबरार असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.

- Advertisement -

दोघेही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही घटना मंगळवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील अळसीपोरा इथं घडली. ही कारवाई राष्ट्रीय रायफल्सच्या 44 तुकडीतील जवान, केंद्रीय राखिव पोलीस दलातील 178 बटालियन आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केली.

26 फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी संजय शर्मा या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 40 वर्षीय संजय सकाळी 10.30 वाजता पत्नीसह बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

संजय हे आचन गावचे रहिवासी होते. ते बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. ऑक्टोबर 2022 नंतर काश्मीर खोऱ्यातील ही पहिलीच टार्गेट किलिंग होती. काश्मीर फ्रीडम फायटर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने संजय यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या