Monday, May 27, 2024
Homeनगरलोंबकळलेल्या तारांमुळे शॉर्टसर्किट ; दोन एकर ऊस जळाला

लोंबकळलेल्या तारांमुळे शॉर्टसर्किट ; दोन एकर ऊस जळाला

बेलपिंपळगाव (वार्ताहर) –

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील एका शेतकर्‍याचा दोन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. विशेष म्हणजे या

- Advertisement -

शेतकर्‍याचा ऊस जळण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. पहिल्यांदा ऊस जळाला त्यावेळी लोंबकळलेल्या तारांबाबत तक्रार करुनही महावितरणने दखल न घेतल्याने शेतकर्‍यावर दुसर्‍यांदा संकट कोसळले त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, बेलपिंपळगाव येथील शेतकरी प्रकाश बोखारे व पार्वतीबाई बोखारे यांच्या गट क्रमांक 625 मधील सध्या तुटून जाण्यासाठी आलेला ऊस शेतात शॉटसर्किट होऊन पेटला. यात बोखारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील महिन्यात याच शेतकर्‍याच्या शेतातील ऊस शॉटसर्किट होऊन पेटला होता महिनाभरात एकाच शेतकर्‍यावर दोनदा वाईट प्रसंग आला आहे.

मागील महिन्यात झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी लेखी स्वरूपात महावितरणकडे तक्रार केली होती. शेतातील विजेच्या खांबांवरील तारा लोंबकळलेल्या असल्याने शॉर्टसर्किट होते.आपण हे काम त्वरित करून घ्यावे असे सांगून लेखी तक्रार केली. मात्र कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी पुन्हा दुसर्‍यांदा शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाल्याने शेतकरी बोखारे हे हवालदिल झाले आहेत.

गावात बर्‍याच ठिकाणी महिना दोन महिन्यांत शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटण्याची पाचवी ते सहावी घटना असून त्यामुळे लवकरात लवकर गावातील या सर्व खांबांवरील तारा काढून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शॉर्टसर्किटची घटना समजताच गावातून व शेजार्‍यांनी याठिकाणी धाव घेऊन ऊस विझविण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी रवींद्र गायकवाड, प्रमोद बोखारे, बाळासाहेब कांगुणे, दिलीप गायकवाड, राधेश्याम गायकवाड, किशोर बोखारे, प्रशांत बोखारे ,डिके मास्तर, विजय गायकवाड, खंडेराव रोटे, किशोर शिंदे, राजेंद्र बोखारे आदी ग्रामस्थ मदतीला धावून आले होते व मोठा अनर्थ टळला

- Advertisment -

ताज्या बातम्या