नाशिक। प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. ३) दुपारी रुग्णालयातील नवजात बालक कक्षात विद्युत पुरवठ्याच्या बाॅक्समधून विजेच्या ठिणग्या पडू लागल्या. उडणाऱ्या ठिणग्या विझवून तत्काळ ६९ नवजात अर्भकांना शेजारील अतिरिक्त पीआयसीयू युनिटमध्ये दाखल केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून परिचारिकांसह स्टाफचे भरभरुन काैतुक हाेत आहे. घटनेने कक्षात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटचे कारण शोधण्याकरीता तपासणी सुरू केली. त्यामूळे प्रशासनाने एसएनसीयूमधील बालकांना सुरक्षित ठिकाणी युनिट सह इतर कक्षात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या बाळांना तिसऱ्या मजल्यावरील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
चेजिंग रूममधील स्विच बोर्डजवळ शॉर्टसर्किट झाले. आग लागलेली नाही. महावितरणचे कर्मचारी तपासणी करण्यासाठी आले आहेत. खबरदारी म्हणून एसएनसीयू कक्ष रिकामा केला आहे. बालकांना अन्य कक्षात हलविले आहे.
-डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय