Friday, February 6, 2026
Homeनगरशॉर्ट सर्कीटने शिवशाही बस जळून खाक

शॉर्ट सर्कीटने शिवशाही बस जळून खाक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव बस स्थानकाशेजारीच (Kopargav Bus Stand) असलेल्या आगारात दुरूस्तीचे काम सुरू असताना शॉर्टसर्कीट (Shortcircuit) झाल्याने शिवशाही बसला अचानक आग (Shivshahi Bus Fire) लागून तिने पेट घेतला. यात ही बस जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यामुळे बस स्थानाकात मोठा गोंधळ उडाला होता.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव आगारात अनेक बस उभ्या असतात. काही बसच्या दुरूस्तीचे काम सुरू असते. शुक्रवारी रात्री देखील शिवशाही बसच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी शॉर्टसर्कीट झाल्याने बसच्या कॅबीनला आग (Fire) लागली. तात्काळ आगीने रौद्ररूप धारण केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व कोपरगाव नगर परिषदेचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहोंचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

YouTube video player

अर्ध्यातासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तोपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती. यावेळी बस स्थानकातील प्रवासी, शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. कोपरगाव आगारातील वर्कशॉपच्या जवळच डीझेल पंप (Diesel Pump) आहे. सुदैवाने इतर बसेसला आगीने विळख्यात घेतले नाही. डीझेल पंपापर्यंत आग पर्यंत पोहोंचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...