Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपेठ : कारवाई टाळण्यासाठी खाजगी बस वाहतुकदारांचा थेट जंगलातून 'शॉर्टकट'

पेठ : कारवाई टाळण्यासाठी खाजगी बस वाहतुकदारांचा थेट जंगलातून ‘शॉर्टकट’

पेठ l Peth (वार्ताहर)

निर्धारीत लांबीपेक्षा अधिक लांबीच्या खाजगी लक्झरी बसेसवर आरटीओ कार्यालयाने कारवाई सुरु केल्याने पेठ मार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्या पेठ शहरापासून २ कि. मी. वर असणाऱ्या आरटीओ चेक पोष्टला गुंगारा देऊन पेठ शहरालगतच्या रस्त्याने तिर्ढे मार्गे करंजाळी गावातून पुन्हा नियोजीत स्थळी वाहतुक सुरु आहे.

- Advertisement -

मुळात हा मार्ग जंगलातून तसेच अरुंद मार्ग असल्याने मोठ्या लक्झरी बसेससाठी अपघातास निमंत्रण देणारा असल्याने कोवीडचे नियम धाब्यावर बसवुन दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करणारे प्रवाशांचे जिवनाशी खेळणारा असल्याने या नियमांचा सुवर्णमध्य साधून प्रवाशाच्या दृष्टीने सुरक्षीत मार्ग काढणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या