Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : दुर्गावतार दाखवा, समीर भुजबळांना विजयी करा

Nashik Political : दुर्गावतार दाखवा, समीर भुजबळांना विजयी करा

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांचे महिलांना आवाहन

मनमाड । प्रतिनिधी Manmad

नांदगावच्या दडपशाहीला आणि भयाला तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. दडपशाही आणि झुंडशाही मोडीत काढण्यासाठी तुमच्यातला दुर्गावतार जागवा. विकासाचे व्हिजन असलेल्या समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने महिलांना केले.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

येथील मातोश्री लॉन्स मध्ये भालूर गट व मनमाड शहरातील बचत गटांचा मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. किल्लेकर पुढे म्हणाल्या की, महिला शिक्षण घेताना सरस्वती, लग्न झाल्यावर लक्ष्मी असतात. नांदगाव मतदार संघातील भयाचे वातावरण दूर करण्यासाठी महिलांनी दुर्गावतार धारण करण्याची वेळ आली आहे. माजी खासदार समीर भुजबळ हे विकासाचे वाटसरू आहेत. म्हणूनच त्यांनी आज हा मेळावा आयोजित करून महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यापुढे पाच वर्षे सतत विकासाची कामे, चर्चा आणि कार्यक्रम होतील. त्यामुळे येत्या 20 तारखेला भुजबळ यांच्या शिट्टी निशाणीलाच मतदान करा, असा आग्रह त्यांनी महिलांना केला.

यावेळी व्यासपीठावर डॉ शेफाली भुजबळ, अपर्णा देशमुख, योगिता पाटील, दीक्षा कर्डक, पुष्पलता मोरे, कविता पवार, पूजा झाल्टे, मीनाक्षी काकळीज आदी उपस्थित होत्या. डॉ भुजबळ म्हणाल्या की, मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी योग्य व्यक्तीला निवडून देणे आवश्यक आहे. समीर भुजबळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यांनी नाशकात खासदारकीच्या कार्यकाळात प्रचंड कामे केली. तशीच कामे आपल्याला येथे करायची आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी राहावे, असे नम्र आवाहन डॉ भुजबळ यांनी केले.

आदर्श महिला मंडळाच्या सुनंदा डिंबर यांनी मनमाडच्या समस्यांना वाचा फोडली तर चांदगावच्या रीना अहिरे यांनी आपल्या भाषणातून येवल्यातील विकासाची सफर महिलांना घडवली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Crime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा...