Thursday, May 15, 2025
HomeUncategorizedश्रींच्या पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास

श्रींच्या पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास

दिपक सुरोसे

- Advertisement -

शेगाव – Shegaon

जातो माघारी पंढरीनाथा

तुझे दर्शन झाले आता

“आम्ही जातो तुमची कृपा असु द्यावी” !

“सकळाच्या पायी हि विनंती आमुची” !!

श्री गजानन महाराज संस्थान (Sri Gajanan Maharaj) शाखा पंढरपुर (Pandharpur) येथुन श्रींची पालखी परतीच्या पायदळ वारीस आंरभ….

श्री गजानन महाराज संस्थानची श्रींची पालखी पंढरपूरला आषाढ एकादशी (Shegaon) शेगाववरून सातशेच्यावर वारकऱ्यांसह दि. ६ जुन रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. दि. ८ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. आषाढ एकादशी उत्सवसाठी ८ ते १२ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होता. श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १३ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे.

श्रींचे परतीचा प्रवास दरम्यान १३ जुलै रोजी पहिला मुक्काम करकंब, १४ जुलै कुईवाडी मुक्काम, १५ रिधोरे, उपळाई स्टेशन मुक्काम, १६ ला भगवान बार्शी येथेच मुक्काम, १७ ला भुम मुक्काम, १८ रोजी चौसाळा मुक्काम,१९ पाली मुक्काम, २० ला बीड मुक्काम, २१, गेवराई मुक्काम, २२ शहापूर मुक्काम, २३, लालवाडी मुक्काम, २४ २५ , जालना मुक्काम, २६ जुलैला सिंदखेडराजा मुक्काम, २७ बिबी मुक्काम, २८ लोणार मुक्काम, २९ मेहकर मुक्काम, ३० जानेफळ मुक्काम, ३१ शिर्ला नेमाने मुक्काम, १ आँगष्ट, आवार मुक्काम, २ आँगस्ट खामगाव मुक्काम व ३ आँँगस्ट रोजी शेगाव येथे दाखल होणार आहे.

श्रींची पालखी शेगाव संतनगरीकडे रवाना : तिर्थक्षेत्र पंढरपुर नगरीमध्ये माऊलीच्या नामस्मरणाने पंढरी नगरी दुमदुमली विठ्ठल गजाननमय जल्लोश माऊली …. आज सकाळी श्रींचा काकडा आरती झाली. नंतर श्रींचा राजवैभव थाटात अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी तिर्थक्षेत्र पंढरपुर येथे विठ्ठल रखुमाई दर्शन परिक्रमा करुनी गोपाळपुरा येथे श्रीहरिचे काल्याचे किर्तन करुनी श्री तिर्थक्षेत्र पंढरपुरला श्री गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपुर येथून सकाळी श्रींची पालखी परतीच्या पायदळ वारीस आंरभ….

श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५३ वे वर्षे असून आपली पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवून आहे. पंढरपूर ते शेगाव असा ५५० कि.मी. चा परतीचा प्रवास व शेगाव ते पंढरपूर असा जाण्या – येण्याचा १३०० कि.मी. या पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत.

श्री गजानन महाराज पालखी दि.२६ जुलै रोजी पहाटे जालना जिल्ह्यातील मुक्काम नंतर दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील नहावा येथे दाखल होईल व सायंकाळी सिंदखेडराजा येथे रात्री मुक्काम राहील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रपती

President Droupadi Murmu: ‘न्यायालयीन आदेशांद्वारे वेळेची मर्यादा घालता येते का?’; राष्ट्रपती...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षावर मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. राज्यपाल विधेयकांना अनिश्चित कालावधीसाठी रोखू...