Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'श्री गणेशोत्सव - 2024' : मनपातर्फे पर्यावरण पूरक आरास स्पर्धेचे आयोजन

‘श्री गणेशोत्सव – 2024’ : मनपातर्फे पर्यावरण पूरक आरास स्पर्धेचे आयोजन

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने यंदाही ‘श्री गणेशोत्सव -2024 घरगुती पर्यावरणपूरक आरास स्पर्धा ‘आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, म्हणून मनपामार्फत विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रम व उपाययोजनांमध्ये नागरिकांचा देखील सहभाग असावा व त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येऊन इतर नागरिकांना त्यापासून प्रेरणा मिळेल व श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक होईल, असा मनपाचा प्रयत्न आहे.

घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तीचे अनुषंगाने शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यांपासून तयार केलेल्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक श्री विसर्जन अशा तीनही प्रकारे घरगुती पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करणार्‍या नागरिकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. या तीनही निकष पूर्ण करणे अनिवार्य असून श्री विसर्जन हे घरीच पर्यावरणपूरक पध्दतीने करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे निकष पूर्ण करणार्‍या उत्कृष्ट तीन सहभागी स्पर्धकांची निवड करून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 5 हजार तर तृतीय पारितोषिक 3 हजार रुपये राहणार आहे.

शहरातील नागरिकांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शाडूमातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या त्यांचे घरातील केलेली पर्यावरणपूरक श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक केलेली श्री गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक पध्दतीने घरीच केलेले श्री विसर्जन आदींचे छायाचित्र [email protected] या संकेतस्थळावर अपलोड करावे. त्याानुसार संबंधित विभागीय अधिकारी हे त्याच्या विभागातील घरगुती आरासांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल याकामी गठीत केलेल्या समितीकडे सादर करतील.त्यांची पडताळणी करून समिती पारितोषिकांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी मनपाच्या या स्पर्धेत सहभागी होऊन श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा व श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा. डॉ.आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा

    - Advertisment -

    ताज्या बातम्या