Monday, June 24, 2024
Homeनगरश्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ प्रकटदिनी उत्सहात साजरा

श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ प्रकटदिनी उत्सहात साजरा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छींद्रनाथांचा प्रकट दिन हजारो भावीकांच्या उपस्थित उत्सहात साजरा करण्यात आला. बडे बाबा मच्छीद्रनाथ महाराज की जय अस जयघोष, फटाक्यांची अताषबाजी, टाळ, मृदंगांचा ध्वनी, शंखनाद, ढोल ताशाचा निनाद, अशा उत्साही वातावरण मंच्छीद्रनाथांचा जन्मउत्सव संपन्न झाला.

नाथ संप्रदयाचे आदय चैतन्य मंच्छीद्रनाथांनी ऋषीपंचमी दिवशी अवतार घेतला. त्यांची संजवन समाधी असलेल्या मायंबा येथे मच्छींद्रनाथ प्रकट दिन पारंपारी पध्दतीने साजरा करण्यात आला. नाथ व वारकरी सांप्रदयाचे प्रमुख पिठ म्हणुन मायंबाची ख्याती आहे. चैतन्य मंच्छीद्रनाथांचा गुढीपाडवा, पौष अमावस्या या उत्सवाप्रमाणेच रुषीपंचमीच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागागातील भाविक मच्छिंद्रनाथ गडावर येतात. देवस्थान समीती व भावीकांच्या उपस्थति मच्छीद्रनाथांच्या संजीवन समाधी व मुर्तीची पहाटे महापुजा करण्यात आली. नाथांच्या संजवनी समाधी मंदीराचा गाभारा, मुख्य मंदिर, तसेच सर्वच ठिकाणी विविध रंगांच्या आकर्षक फुले व फुग्यानी वैशिष्ट्यपूर्ण केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती.

सकाळी 6 वाजता .नवनाथ ग्रंथातील अवतार प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. यांनतर हभप अशोक महाराज मरकड व देवस्थान समीतीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येऊन भजनी मंडळाच्या स्थानीक महिलांनी मच्छीद्रनाथांचा जन्माचा पाळणा गायला. संत मंहत व उपस्थीत भावीकांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला. त्यानंतर नाथांच्या अश्वाची मंदीर आवारातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नाथांच्या जयजयकाराने मंदीर परीसर दुमदुमुन गेला होता.

यावेळी देवस्थान समीतीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सचिव बाबासाहेब म्हस्के, ह.भ.प.अशोक महाराज मरकड, राजेंद्र म्हस्के, अनील म्हस्के, साहेबराव म्हस्के, रमेश ताठे, संरपंच लिलाबाई चंदनशिव, भरत भगत, धनंजय बोरुडे, नितीन म्हस्के, सोपन भगत, कर्मचारी शरद गिरी, आयुब शेख आदी उपस्थीत होते. देवस्थान समितीने माहाप्रसादाचे दिवसभर वाटप केले .

घोड्याचा समाधीला मुजरा

मच्छिंद्रनाथाचा प्रकट दिन या उत्सवासाठी दरवर्षी गर्दी वाढत असून यावर्षी पुणे, नाशीक, कल्याण विभागातुन भावीकांची संख्या मोठी होती. मिरवणूकीत नाशीक येथील घोड्यांनी मनोवेधक नृत करून आसमान झेप घेत नांथांच्या समाधीला मुजरा केला. या घोड्यांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या