नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
देवळाली गावचे (Devalali village) ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रेला (Mhasoba Maharaj Yatra) आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा तीन ते चार दिवस सुरू राहणार असून यात्रेला संपूर्ण पंचक्रोशीतून सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक हजेरी लावणार आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येत आहे….
गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (Corona) श्री म्हसोबा महाराजांची यात्रा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत सुरू होती. परंतु, यंदा करोनाचे सर्व निर्बंध हटल्याने यात्रेला पुन्हा पूर्वीचे स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आज सकाळी यात्रेला विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा अभिषेक करून सुरुवात झाली. यावेळी पहाटे योगेश गाडेकर व जयश्री गाडेकर तसेच उमेश जाधव व नंदा जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मांडव डहाळी कार्यक्रम करण्यात आला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू
याशिवाय, यात्रेनिमित्त श्री म्हसोबा महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर व परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने, खेळणी व खाद्यपदार्थाचे दुकाने मोठ्या प्रमाणात थाटले आहे. तर सकाळपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी (Devotees) मोठ्या रांगा लावल्या होत्या. तर यात्रेची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येत आहे.
Video : दोन एकर कांदा पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर
तसेच मंदिराच्या समोर पोलिसांनी (Police) स्वतंत्र कक्ष उभारला असून भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण राहावे, यासाठी माहिती देण्यात येणार आहे. तर यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, पंकज भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम, उपनिरीक्षक धनराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
… अन् वयाच्या सत्तरीत ‘त्यांनी’ बांधली लग्नगाठ
दरम्यान, यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, माजी महापौर दशरथ पाटील, श्री म्हसोबा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, तसेच माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, मनोहर कोरडे, उत्तमराव कोठुळे आदींनी उपस्थित राहून दर्शन घेतले व मिरवणुकीत सहभागी झाले.
क्रूरतेच्या सर्व सीमा पार..! प्रेयसीला मेसेज केल्याने मित्राचीच केली हत्या; हृदय काढलं, गुप्तांग छाटलं अन् फोटो…