Monday, April 7, 2025
Homeनगरश्रीरामनवमीची शिर्डी, श्रीरामपूरात धामधूम

श्रीरामनवमीची शिर्डी, श्रीरामपूरात धामधूम

रामनवमीला साईबाबांच्या सुवर्णरथाची भव्य मिरवणूक : भाविकांची झुंबड

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जागतिक किर्तीचे देवस्थान म्हणून नावारूपास आलेल्या साईबाबांच्या शिर्डीत यंदाच्या 114 व्या रामनवमी उत्सवप्रसंगी काल सायंकाळी पालखी मार्गाने साईबाबांच्या सुवर्णरथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुवर्ण रथ मिरवणुकीत मुंबईसह पुणे येथील ढोल पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.यावेळी लाखो भाविकांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबा संस्थान आयोजित रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लाखो भाविकांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. रविवारी रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींची काकड आरती झाली. परिसरातील वीस हजाराहून अधिक भाविकांनी 16 कि.मी पायी चालत कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पाणी आणून प्रातिनिधिक स्वरूपात ठेवलेल्या साईबाबांच्या मूर्तीवर टाकुन जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर साई सच्चचरित्र ग्रंथाच्या अखंड परायणाची समाप्ती झाली.

- Advertisement -

यावेळी श्रींचे फोटो, पोथी व श्रींची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी साई संस्थानच्या अध्यक्ष तथा प्रधान न्यायाधीश अंजु शेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, सामान्य प्रशासन रामदास कोकणे आदींच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी पाच वाजता श्री साईबाबांच्या सुवर्णरथाची मिरवणूक द्वारकामातून काढण्यात आली.तत्पूर्वी साईबाबांच्या पादुका व सटका साईसमाधी मंदिरातून वाजतगाजत द्वारकामाईत आणण्यात आल्या. याठिकाणी साईबाबांची आरती करण्यात आली. त्यानंतर फुलांची सजावट केलेल्या सुवर्णरथात प्रभू रामचंद्राचा फोटो व साईबाबांच्या पादुका, सटका आणी फोटो ठेऊन हा सुवर्ण रथ द्वारकामाई पासून पालखी मार्गाने प्रवेशद्वार क्रमांक चारमधून पुन्हा मंदिरात आणण्यात आला.श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या प्रमुख चार उत्सवाची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक महत्त्वाचा उत्सव असलेल्या रामनवमी उत्सवाला दिवसेंदिवस देश विदेशातील लाखो भाविकांनी हजेरी लावली.

साईबाबांच्या सुवर्णरथाच्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागी झाले होते. मुंबई, पुणे येथील ढोल ताशा पथक प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पाच वाजता निघालेला साईबाबांचा सुवर्णरथ साडेसात वाजेच्या दरम्यान मंदिरात जाऊन पोहचला. याप्रसंगी शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त यांनी पालखी मार्गावर सर्वत्र पाण्याचा सडा मारून ठिकठिकाणी महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. तर पन्नास वर्षांपासून साईबाबांच्या मंदीरात सेवा देणारे सन्मित्र मंडळ शिर्डी यांचे झांज पथकाने उत्कृष्ट झांज वाजवत नृत्य सादर केल्याने उपस्थित साईभक्तांच्या डोळ्यांची पारणे फेडले. त्याचप्रकारे क्रांती युवक मंडळ शिर्डीच्या पथकाने देखील भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी साखळी तयार करून सेवा साई चरणी रुजू केल्याचे पहावयास मिळाली.

द्वारकामाईच्या छप्परावर दोन निशाणं लावण्यात आली असून हे निशाणं बदलण्याची सुमारे सव्वाशे वर्षाची परंपरा आहे. यातील एक संपूर्ण हिरवे असून त्यावर भक्त दामुअण्णा सावळाराम कासार (रासने) अहमदनगर, सन 1892 असे लिहिलेले आहे. तर दुसरे निशाण नानासाहेब निमोणकर जि.अहमदनगर यांचे हिरवे- भगवे आहे. ही निशाणं दरवर्षी रामनवमीला याच परिवारातील सदस्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून नविन बदलून टाकण्यात येतात.

श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी ना.विखे, आ.ओगले, मुरकुटे, ससाणे, कानडेंसह अनेक नेत्यांची हजेरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मेनरोडवरील श्रीराम मंदिर, वॉर्ड नं. 7 मधील काळाराम मंदिर व श्री हनुमान मंदिरासह विविध मंदिरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रीरामांच्या पाळण्याची दोरी ओढून श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह महिला भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्यने होती.

महसूल, पोलीस प्रशासनासह विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर मिरवणुकीने येऊन मंदिरावर झेंडे चढविले यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार हेमंत ओगले, माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, यांच्यासह प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलिसांनी दिलेल्या मार्गावरून श्रीरामनवमी मिरवणूक उत्साहात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar श्रीरामनवमी निमित्त रविवारी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने...