Monday, May 19, 2025
Homeनगरपाळणे थत्ते मैदानावरच; परंतु दोरी यात्रा कमिटीच्या हाती!

पाळणे थत्ते मैदानावरच; परंतु दोरी यात्रा कमिटीच्या हाती!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीराम नवमीनिमित्त थत्ते मैदानावर पाळणे व खेळणी दुकानांसाठी ठेकेदार व नगरपालिका यांच्यात सरकारी बोलीच्या कारणावरुन गेल्या दहा दिवसांपासून दर निश्चित होत नव्हते. मात्र काल अखेर नगरपालिकेने यात्रा कमिटीलाच पाळणे चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. पालिकेने यात्रा कमिटीला पाळणे चालविण्याचा ठेका दिल्याने हिंदुत्वादी संघटनांनी स्वागत केले आहे. त्यामुळे पाळण्याचे दर सर्वसामान्याना परवडतील असे 20 व 30 रुपये इतकेच आकारले जाणार आहेत. मात्र रासकरनगर येथ काही पाळणेवाल्यांनी पाळणे उभे केले होते ते मात्र आता काढावे लागणार असल्याने या वादात पाळणेवाल्याचे हाल होत आहेत.

मागील वर्षी पालिकेने पाळण्याचा ठेका 34 लाख 11 हजार 100 रुपयांना दिेला होता. त्यामुळे पालिकेने सरकारी बोलीही 34 लाख रुपये ठेवली होती. मात्र सरकारी बोली 15 लाखांपासून सुरु करावी अशी मागणी पाळणेधारकांनी केली होती. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याशी चर्चा करुन सरकारी बोली ही 34 लाखांऐवजी 31 लाख रुपये ठेवली. मात्र ठेकेदारांनी ही बोली 15 लाखांऐवजी 17 लाख रुपयांवरुन सुरु करावी, अशी मागणी केली. मात्र यास मुख्याधिकार्‍यांनी नकार दिला आणि पुन्हा एक़दा तिसर्‍यांना ठेवलेला फेरलिलाव रद्द करण्याची वेळ आली. चार दिवसांवर यात्रा येवून ठेपली असतानाही अद्यापही या दरामुळे पाळणेवाल्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ होता.

श्रीरामनवमी यात्रा काही दिवसावर येवून ठेपलेली असताना पाळण्यावाल्यांनी थेट रिकाम्या जागा मालकाचा शोध घेवून त्यांच्याशी चर्चा केली आणि काही नाममात्र पैसे आकारुन सदरचे पाळणे रासकरनगर येथे बसविण्याचा निर्णय घेतला. नगरपालिकेच्या नाहरकत दाखल्याबाबत श्री. रासकर यांनी अर्जही केला होता. काही पाळणे उभे करण्याचे कामही सुरु झाले होते.

काल मात्र भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक बा. चव्हाण, मनसेचे बाबा शिंदें, डॉ्र दिलीप शिरसाठ, गौतम उपाध्ये, यांच्यासह असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काल प्रशासक व मुख्याधिकार्‍यांची भेट घेवून सदरचे पाळणे थत्ते मैदानावरच ठेवावेत व सदरचे पाळणे हे यात्रा कमिटीकडेच द्यावेत. यापूर्वी सदरचे पाळणे व खेळणी दुकानांचे अधिकार हे यात्रा कमिटीकडेच होते.

मात्र मध्यंतरीच्या काळात याचे टेंडर काढून ठेकेदारांना सदरचे पाळणे चालविण्यात देण्यात येत होते. मात्र ही प्रथा बंद करुन पुन्हा यात्रा कमिटीकडे सदरचे पाळणे व अन्य दुकाने कमी दराने चालविण्यास देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार काल मुख्याधिकार्‍यांनी यात्रा कमिटीला 17 लाख रुपयांना हा ठेका देण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान पाळण्याचे दर हे केवळ 20 रुपये व 30 रुपये अशीच दरे ठेवावेत, असेही मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. मुख्याधिकार्‍यांनी काल यात्रा कमिटीला पाळणे देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा सत्कार केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ मे २०२५ – फार नाही मागणे

0
नुकताच जागतिक कुटुंब दिवस जगाने साजरा केला. अनेक पाश्चात्य देशांमध्ये कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याचे नेहमीच बोलले जाते. बहुसंख्य देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक आढळतो. तेथील समाज...