चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ महाराज (Swami Samarth Maharaj) यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव येथील श्री स्वामी सेवा केंद्रात (Swami Seva Kendra) अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते.
यंदा (corona) कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सेवा केंद्रात प्रत्यक्ष सप्ताहाद्वारे सेवा करण्यात आली. २२ एप्रिल रोजी सप्ताहाला सुरुवात झाली तर गुरुवारी २८ रोजी महाआरती करून या पुण्यतिथी सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. गुरुवारी महाआरतीवेळी पुरुष व महिला भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
गॅस एजन्सी चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव येथील हिरापूर रोड जवळील सानेगुरुजी नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत गुरुवारी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व गुरू चरित्र वाचन सप्ताहाची सांगता करण्यात आली.
Visual Story : अहो आश्चर्यंम! ‘या’ बड्या नेत्यांनी आजवर भरले अनेक हजारांचे चलन
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुवारी संकाळी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार पूजन करून अभिषेक करण्यात आला. तसेच सकाळी सप्ताहानिमित्ताने यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. तर सं.१०.३० वा महानैवेद्य आरती करुन सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली.
यावेळी दर्शनासाठी भक्तांनी दिवसभर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान सप्ताहाभरात नित्यस्वाहकार गणेश याग, मनोेबोध याग, चंडी याग, स्वामी याग, गिताई याग, रुद्र याग, मल्हारी याग, बली पूर्णाहती, सत्यदत्त पूजन आदि धार्मिक विधी करण्यात आले.
यात महिला व पुरुष सेवेकार्यांनी भाग घेतला होता. तर विशेष म्हणजे यंदा गुरुचरित्र पारायणासाठी पुरुष व महिलाची संख्या दोनशेच्यावर होती.