नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी
श्री.स्वामी समर्थ महाराज (Shri Swami Samarth) यांच्या पुण्यतिथी (Punyatithi) निमित्त नंदुरबार जिल्हा सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आला होते . कोरोना (corona) काळामुळे गेले दोन वर्षे दत्त जयंती सप्ताह व श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी (Shri Swami Samarth Punyatithi) सप्ताहची सेवा ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होती.परंतु यावर्षी कोरोना चा प्रभाव कमी झाल्यामुळे ऑफलाईन सेवा केंद्रात करण्यात आली .दि 22 एप्रिल रोजी सप्ताह ला सुरुवात झाली व 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता महाआरती (Maha Aarti) करून सप्ताहाची सांगता करण्यात आली .
या सप्ताह कालावधीत नंदुरबार सेवा केंद्रात (Swami Seva Kendra) श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी (Punyatithi) अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्त विविध सेवा करण्यात आल्या, यात गणेश याग ,मनोबोध याग,चंडीयाग,रुद्र याग,गीताई याग ,स्वामी याग असे याग करण्यात आले .
सप्ताह कालावधीत श्री स्वामी समर्थ माळ जप 35लाख 34 हजार 192, श्री नवार्णव मंत्र माळजप 2 लाख 39 हजार 328,श्री गायत्री मंत्र माळजप 2 लाख 54 हजार 124,श्री महा मृत्यूजय मंत्र माळजप 1 लाख 15 हजार 128 ,दुर्गा सप्तशती पाठ 123, श्री स्वामी चरित्र सारामृत 390 ,श्री रुद्र पाठ 25,श्री मल्हारी सप्तशती 28,श्री गुरुचरित्र पारायण 195 अश्या प्रकारे सेवा करण्यात आली.
या सोबत लहान मुलाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सप्ताह काळात चौपाळे येथील प्रशिक्षण प्रकल्पात बालसंस्कार विभागामार्फत (Department of Child Culture) विविध ऍक्टिव्हिटी राबविल्या गेल्यात यात स्तोत्र मंत्र पठणसह क्यूब,मिडब्रेन, वारली पेंटिंग, रोबोटिक्स, लाठीकाठी,शिशुसंस्कार आदी प्रशिक्षण लहान मुलांना देण्यात आले .यावेळी शेकडो सेवेकरींनी सप्ताहात आपली सेवा स्वामी चरणी रुजू केली.