श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील चार गावात करोना बाधीत रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा वाढला आहे. शहरात एकाच कुटुंबातील सात जण, शहरातील एक अन्य तर गार, वडाळी, लोणी व्यंकनाथ आणि कोळगाव मधील प्रत्येकी एक जण बाधीत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात 13 जुलै रोजी सर्वात जास्त रुग्ण पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे तालुक्यातील हे भाग लॉकडाऊन करण्यासाठी हालचाली झाल्या. शहरात आज एकुण आठ बाधीत रुग्ण, कोळगाव, वडाळी, लोणीव्यंकनाथ गार येथे प्रत्येकी एक जण असे बारा जण बाधीत सापडले आहेत.
त्यामुळे करोनाचा बाबत अधिक भीती सर्वत्र पसरली असून कामाशिवाय लोकांचे फिरणे महागात पडत असल्याचे समोर आले आहे. शहरातील आता एकाच कुटुंबात सात जण करोनाबाधित झाले आहेत. तर लोणीव्यंकनाथ येथील व्यक्ती अनेक महत्वाच्या लोकांच्या संपर्कात आल्याने चिंता वाढली आहे.