Saturday, May 4, 2024
Homeनगरबोगस कांदा बियाणे फॅक्टरीचा पर्दाफाश

बोगस कांदा बियाणे फॅक्टरीचा पर्दाफाश

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

बोगस कांदा बियाणे बेकायदेशीर पद्धतीने साठवणुक करणे, परस्पर एका खाजगी कंपनीच्या बॉक्समध्ये सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते व शेतकर्यांना वितरीत करणे, या गुन्हेगारी कृत्यामुळे तालुक्यातील मांडवगण येथुन अमोल प्रकाश धबागडे या ईसमास श्रीगोंदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

दि. २८ रोजी मांडवगण येथे कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून विराट ऐग्रो इनपुट, जालना या कंपनीच्या कांदा बियाण्याचे ५०० ग्रैम वजनाचे ८० बॉक्स, ७० किग्रॅ सुट्टे कांदा बियाणे, सिलीगं मशीन, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या ईत्यादी अन्दाजे ₹.३.०५ लक्ष रक्कमेचा माल जप्त करण्यात आला आहे. बियाणे अधिनियम, १९६६ आणि बियाणे नियंत्रण आदेश, १९८३ या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात अहमदनगरच्या कृषी विभागास यश मिळाले आहे. संबधीत बियाण्याचा नमुना काढुन बियाणे प्रयोगशाळा, पुणे येथे पाठवण्यात आला आहे. ही कारवाई राजेश जानकर, मोहीम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करित आहेत.

शेतकर्यांनी कोणत्याही प्रकारचे बियाणे हे केवळ, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे आणि त्या वेळी न विसरता परिपूर्ण बिल घ्यावे.

राजेश जानकर, मोहिम अधीकारी, कृषी विभाग, अहमदनगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या