श्रीगोंदा (प्रतिनिधी)
श्रीगोंदा शहरापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या अधळगाव रस्त्यालगतच्या सुमारे २५ हेक्टर राखीव वनक्षेत्रात झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. लाकूड तस्करांच्या या धुमाकूळामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसापासून ही जंगलतोड सुरू आहे.प्रादेशिक वन विभाग तात्पुरती कारवाई करते मात्र ही लाकडांची तस्करी थांबत नाही
तालुक्यातील अनेक बेकरी, भट्टी, हॉटेल्स आणि ढाब्यांवरील जळणासाठी निलगिरी, सुबाभूळ यांसह अनेक जंगली झाडांची तोड केली जात आहे. झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक असताना लाकडाचा आरा गिरण्या मध्ये सर्रास जंगली लाकडे कापून आणले जात असताना श्रीगोंदा वन विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन बसला असताना
तस्कर दुपारी व संध्याकाळी मशीनच्या साहाय्याने झाडे तोडत असून, दररोज किमान ४ ते ५ टन लाकूड गायब होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.वन विभागाचे अधिकारी ,वनरक्षक,वनपाल आदि कर्मचारी वनविभागाकडे असताना महामार्गलगत च्या जंगलात असे लाकडे तोडली जात आहेत. वनविभागाच्या गस्त घालण्याची वेळ आणि तस्करांचे लाकडे तोडण्याची वेळ यात हा परिसर लवकरच उघडा बोडखा होईल यातील वन्य जीवान धोका उत्पन्न होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.ही झाडे तोडून पुन्हा तोडण्यात आल्याची तक्रार नंतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी इथे भेट दिली
जंगल उघडे पडत असल्यामुळे हरिण, काळवीट, तरस, कोल्हे आणि बिबट्यांसारखे वन्यजीव आता अन्नाच्या शोधात शेतीक्षेत्र व नागरी वस्त्यांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, शेतात काम करताना शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.


