Saturday, May 4, 2024
Homeनगरअध्यक्षांमुळे नागवडे कारखान्याचे चार कोटींचे नुकसान

अध्यक्षांमुळे नागवडे कारखान्याचे चार कोटींचे नुकसान

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

सभासद हितास प्राधान्य न देता नागवडे साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी दोन लाख साखर पोती टेंडर 3 हजार 150 रुपये दराने देवून सुमारे चार कोटीचे नुकसान केल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी पत्रकार परिषदेत केला .

- Advertisement -

तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.4) नागवडे कारखान्यातील गैरकारभारा बाबत पत्रकार परिषद घेऊन मगर यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भोसले, पंचायत समिती सदस्य जिजाबापु शिंदे, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, संचालक अड.बाळासाहेब काकडे, अड.बापुसाहेब भोस, अजित जामदार, यांच्यासह मान्यवर हजर होते.

यावेळी बोलताना केशवभाऊ मगर म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे बापुच्या विश्वासाला आपण कधी तडा जाऊ दिला नाही.पण त्याच्या निधनामुळे अध्यक्षपदी असलेला त्यांचा मुलगा राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही पद्धतीने कारखान्याचा कारभार सुरू केला आहे,शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या नागवडे सहकारी कारखान्यात सभासद हिताचे निर्णय घेतले नाही. दोन दिवसापूर्वी शिवम एन्टरप्रायजेस या कंपनीला 2 लाख टन साखर पोती एक्सपोर्ट करण्यासाठी 3 हजार 150 रुपयेने दराने विक्री केली तर इतर कारखान्यांनी 3 हजार 380 रुपयेने दराने विक्री केली आहे.

यामध्ये 220 रुपये पोत्यामागे तोटा होवून कारखान्याचे सुमारे चार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. दिलेले टेंडर जर वेळीच थांबविले नाही तर आम्ही संचालक कारखाना गेटवर उभेराहून एकही साखर पोत्याची गाडी बाहेर जावू देणार नाही. त्याच ठिकाणी सभासद हितासाठी आंदोलन करु असा इशारा दिला आहे. साखर कारखान्यात अध्यक्ष झाल्यापासून राजेंद्र नागवडे यांनी कधी सभासद हित जोपासले नाही.आणि आता समाजसेवेचा खोटा भुरखा घेवून गावागावात पिठाची गिरणी आणि शुद्ध पाण्याचे फिल्टर कमी किमतीमध्ये देवून सभासदांची दिशाभूल करित आहे.पण जनता तुम्हांला ओळखून आहे. असे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर म्हणाले.

कारखान्यावर प्रशासक नेमावा

नागवडे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया हि पुढे जात असेल तर हरकत नाही. परंतु कारखान्यात गैरकारभाराची न्यायालयात चौकशी चालु आहे तोपर्यंत कारखान्यात प्रशासक नेमावा अशी मागणी मगर. सभासद हितासाठी आपण पूर्ण ताकदीने कारखाना निवडणूक लढविणार आहे. आमच्यावर पोरकटपणाचे आरोप करणार्‍या अध्यक्षानी सिद्ध करुण दाखवावे आमचे त्यांना जाहिर आव्हान आहे असे मगर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या