Sunday, June 8, 2025
Homeनगरश्रीगोंदा बाजार समितीच्या सचिवाविरोधात शास्तीची कारवाई करण्याचे आदेश

श्रीगोंदा बाजार समितीच्या सचिवाविरोधात शास्तीची कारवाई करण्याचे आदेश

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

- Advertisement -

श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीशिवाय पगार वाढ केल्याची तक्रार बाजार समितीचे संचालक उमेश पोटे यांनी केली होती. याबाबत निर्णय देताना जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बाजार समिती सचिव दिलीप डेबरे यांनी केलेले संस्थेचे नुकसान व्याजासह भरण्याचे तसेच त्यांच्या विरोधात शास्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी संचालक मंडळाच्या अस्थिर कारभाराचा फायदा घेत आपला पगार जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी न घेता संचालक मंडळाच्या ऐनवेळीच्या ठरावात नोंद करून परस्पर वाढवला. त्याला सहकार खात्याची मान्यता घेतली नसल्याने याची तक्रार संचालक उमेश पोटे यांनी केली होती.

याचा चौकशी अहवाल आला असून बाजार समितीचे साचीव दिलीप डेबरे दोषी असल्याचा अहवालात नोंद असल्याने त्यांच्यावर क्रारवाई करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते.

बाजार समितीला सोसावे लागलेले आर्थिक नुकसान व्याजासह दिलीप डेबरे, सचिव कृषिउत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांच्याकडून एकरकमी वसूल करावे. तसेच दिलीप डेबरे सचिव कृषिउत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांच्याविरुध्द महाराष्ट्र कृषिउत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 तसेच मंजूर उपविधी व सेवानियमातील तरतुदीनुसार शास्तीची कारवाई करावी.

वरील 1 व 2 बाबतच्या निर्देशाचा अनुपालन अहवाल 30 दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करावा अन्यथा कृषिउत्पन्न बाजार समितीकडून श्रीगोंदा बाजार समितीच्या सदस्यांविरुध्द पुढील उचित ती कार्यवाही केली जाईल असे जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ठाकरे व पवार यांच्या एकत्रिकरणाच्या निव्वळ चर्चा – मंत्री...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य...