Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांची आर्थिक लूट

श्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांची आर्थिक लूट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील श्रीमंत बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील गुंतवणुकदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, या कंपनीत गुंतवणूक करायला लावणार्‍या पारनेर शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत याप्रकरणी कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक) यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील एका नावाजलेल्या संस्थेतील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांनी संगनमत करून श्रीमंत बाजार ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) यांच्या माध्यमातून दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदारांना परताव्याचे आमिष दाखवून, शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर कमिशन व भेट म्हणून अलिशान गाड्या मिळाल्या.

या दोघांमुळे अनेकजणांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले असून, पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पारनेर शहरासह सुपा, वाडेगव्हाण, शिरूर, कान्हूरपठार, टाकळी ढोकेश्वर, निघोज, भाळवणी, आळकुटी या प्रमुख गटातील व्यावसायिकांना फटका बसला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या