Tuesday, March 25, 2025
Homeनगरनिकृष्ठ व नियमबाह्य कामांची बिले देण्यास 11 संचालकांचा विरोध

निकृष्ठ व नियमबाह्य कामांची बिले देण्यास 11 संचालकांचा विरोध

बाजार समितीच्या मासिक बैठकीत लेखी पत्र सादर || सत्ताधारी मुरकुटे गटाच्या संचालकांचा समावेश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे मुख्य आवार आणि बेलापूर व टाकळी उपबाजारात सुरु असलेली कामे नियमबाह्य व निकृष्ठ दर्जाची असल्याने त्याची बिले अदा करण्यास बाजार समितीच्या अकरा संचालकांनी मासिक बैठकीत लेखी विरोध नोंदविला आहे. विशेष म्हणजे विरोध करणारांमध्ये सत्ताधारी मुरकुटे गटाच्या संचालकांचा समावेश आहे.
सभापती आणि प्रभारी सचिव यांना या बैठकीत दिलेल्या लेखी हरकत पत्रात त्यांनी म्हटले आहे की, बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा मार्केट मधील पूर्व-पश्चिम रस्त्याचे काँक्रिटीकरण व बेलापूर उपबाजार भुसार आवारातील रस्त्याचे काँक्रिटिकरण कामांचे फायनल बिलाबाबत विचार करणे हा बैठकीतील विषय पत्रिकेवरील विषय क्र. 7 आणि 8 याबाबत चर्चा करताना 18 पैकी 11 संचालकांनी लेखी विरोध दर्शविला.

- Advertisement -

त्यात त्यांनी वरील दोन्ही कामांसह बेलापूर आणि टाकळीभान उपबाजारात सुरु असलेली कामे ही नियमबाह्य व निकृष्ठ दर्जाची असल्याचा ठपका ठेवला आहे.
या कामांची निविदा देताना पणन संचालकांनी घालुन दिलेल्या शर्ती व अटींचे पालन केले नाही. शासकीय नियमावली डावलुन वाढीव इस्टीमेट करण्यात आले. विकास कामे विकास आराखड्यात समाविष्ट करुन प्राधिकरणाच्या सक्षम अधिकार्‍याची मंजुरी घेण्यात आली नाही. याबाबत मासिक बैठकीत चर्चा न करता बेकायदा मंजुरी दाखवून इतिवृत पुस्तिकेत नियमबाह्य नोंद घेतली आहे. अद्याप ही कामे अपूर्ण असताना त्यास अंतिम मंजुरी घेण्याचा प्रयत्न होत आहे.असाही आरोप त्यांनी विद्यमान सभापती व प्रभारी सचिव यांच्यावर केला आहे. या पत्रावर उपसभापती अभिषेक खंडागळे, संचालक नानासाहेब पवार, सुनील शिंदे, गिरीधर आसने, सरला बडाख, किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, मयुर पटारे, दिपक हिवराळे, जितेंद्र गदिया यांच्या सह्या आहेत.

अविश्वास आणता येत नसल्याने त्रास देण्याचा प्रयत्न-नवले
याबाबत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांना विचारले असता ते म्हणाले, काल बाजार समितीची मासिक सभा 11 वाजता होती. मात्र, 11.30 वाजेपर्यंत कोरम एवढे संचालक उपस्थित न राहिल्याने 11.30 ला आपण सभा तहकूब केली. त्यानंतर 12 वाजता विरोधी संचालक आले. त्यांनी सभा घेण्याची मागणी केली. त्या 11 संचालकांनी जे पत्र दिले आहे. ते वास्तविक पाहता पणन संचालकांना द्यायला पाहीजे होते. ज्या 2 कामांवर त्यांचा आक्षेप आहे त्या दोन्ही कामांची पणनकडून मंजूरी घेतल्यानंतर त्या कामाचे टेंडर ओपन केलेले आहे. वर्कऑर्डर दिलेली आहे. या दोन्ही वेळेस आता विरोध करणार्‍या संचालकांच्या सह्या आहेत. या कामाला विरोध होता तर त्यावेळी त्यांनी विरोध का केला नाही? असा सवाल उपस्थित करुन सभापती नवले म्हणाले, ठेकेदाराने चांगले काम केले आहे आणि काम पूर्ण झालेले असल्याने त्यांना पैसे देणे गरजेचे आहे. परंतू, आणखी 6 महिने तरी आपल्यावर अविश्वास ठराव आणला जाऊ शकत नसल्याने आपल्याला त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्री. नवले यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...