Friday, November 22, 2024
Homeनगरश्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेकांची ‘चढाओढ’

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेकांची ‘चढाओढ’

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून आपल्यालाच पक्षाकडून उमेदवारी मिळणार म्हणून अनेकांनी मोर्चाबांधणी सुरू केली आहे. राखीव मतदार संघाची शेवटची टर्म असल्याने अनेक इच्छुकांनी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचा आग्रह धरला आहे.

- Advertisement -

महायुतीकडून (शिंदे शिवसेना) माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खा. सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे हे शिंदे सेनेकडून उमेदवारीचा दावा करत असतानाच शेतकरी प्रश्नावर काम करणारे नितीन उदमले त्याचबरोबर पढेगावचे जितेंद्र तोरणे यांची उमेदवारीच्या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. भाजपाकडून नितीन दिनकर, मिलिंदकुमार साळवे, रिपाइंकडून राजाभाऊ कापसे किंवा सुरेंद्र थोरात, उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.

तसेच महाविकास आघाडीकडून (काँग्रेस) विद्यमान आमदार लहु कानडे, काँग्रेस ससाणे गटाकडून हेमंत ओगले, उबाठा शिवसेनेकडून रोहित वाकचौरे आदींसह वंचितकडून उत्कर्षा रुपवते, सुहास राठोड, दीपक त्रिभुवन, प्रशांत केदारी, राजेंद्र रत्नाकर वाघमारे तसेच रामचंद्र जाधव, या नावांबरोबरच विश्वनाथ निवाण, विजय खाजेकर, आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्राबरोबरच राज्यातही बर्‍याच प्रमाणात राजकीय हालचाली झाल्या. आतापर्यंतच्या बहुतांश पंचवार्षिक निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे.

परंतु श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय परिस्थितीबरोबरच धार्मिक परिस्थितीमध्ये झालेल्या बदलामुळे महायुतीकडून या मतदार संघावर शिवसेना शिंदे गट दावा करत आहे. असे असले तरी या मतदारसंघावर भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दावा केला आहे. ही जागा भाजपला मिळाली तर भाऊसाहेब कांबळे कमळाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला तर काँग्रेस व शिवसेना शिंदे गट अशी लढत पहायला मिळेल. माजी आ. भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीचा पक्का दावा करत आहेत.

तसेच दहा वर्षे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यावेळी लोकसभेला पराभूत झाले. मात्र, श्रीरामपूर मतदार संघात त्यांना आघाडी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मुलगा प्रशांत लोखंडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी ते आग्रही आहेत. शिवसेनेकडून कांबळे, लोखंडेंची नावे चर्चेत असताना शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आणि किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले व पढेगावचे उद्योजक जितेंद्र तोरणे यांनीही स्पर्धेत जोरदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळविण्यात कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या