Sunday, October 4, 2026
HomeनगरShrirampur : अखेर बेग, जेधे टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

Shrirampur : अखेर बेग, जेधे टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील बेग, जेधे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार या टोळीवर दाखल गुन्ह्यात मोक्का (मकोका) चे वाढीव कलम लावण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस निरीक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गु.र.नं 58/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,111, 49,238,3(5) सह शस्त्र अधिनियम चे कलम 3,7,25 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन 1999चे कलम 3(1) (खख),3(2),3(4) ही वाढीव कलमे लावण्याकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

- Advertisement -

सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने नमुद गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन 1999 प्रमाणे कलमवाढ करण्यात येऊन विजय मुन्ना जेधे ऊर्फ गोरख जेधे (वय 33) रा. काँगेस भवन शेजारी, डावखर रोड, वार्ड नं.6 श्रीरामपूर, मनोज संजय साबळे, रा. वार्ड नं.7, श्रीरामपूर, सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग (वय 41) रा. सरस्वती कॉलनी, वार्ड नं.7, श्रीरामपूर, अंकुश रमेश जेधे, रा. काँग्रेस भवन शेजारी, वॉर्ड नं.6, श्रीरामपूर यांचेसह दोन विधीसंघर्षीत बालक यांचेवर मोक्का (मकोका) कायद्यांतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोउपनि रोशन विजय निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडे (स्थानिक गुन्हे शाखा), पोकॉ फिरोज पटेल आदींनी केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...